Posts

Showing posts from February, 2019

Supervisor licence process in Maharashtra

    या पोस्टमध्ये आपण पर्यवेक्षक परवान्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेबद्दल आणि आवश्यक कागदपत्रांसंबंधी  आवश्यक माहिती पाहू. "शैक्षणिक पात्रता आणि अनुभव" 1. पर्यवेक्षक परीक्षेसाठी: शैक्षणिक पात्रता अनुभव वायरमन परीक्षा 3 तीन वर्ष प्रमाणित कंत्राटदार किंवा विद्युत अभियांता यांच्या अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव, यामध्ये किमान दोन वर्षे अनुभव हा वायरमन परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतरचा असावा. किंवा ITI परीक्षा उत्तीर्ण व  इलेक्ट्रिशियन / वायरमन ट्रेड   अप्रेंटीसशीप NCTVT  प्रमाणपत्रासह एक वर्षाचा अनुभव. अभियांत्रिकी पदवी व पदवीका ही विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स  आणि  पॉवर व त्या समकक्ष असणे आवश्यक आहे. एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव. 2. पर्यवेक्षक परीक्षेतून सूट मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता: पर्यवेक्षक परीक्षेतून सूट मिळवण्यासाठी  केवळ पदवीधर आणि डिप्लोमा यामध्ये विद्युत किंवा संलग्न विषय असणारे उमेदवार पात्र राहतील. ( इतर ट्रेडस असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा अनिवार्य आहे.) आवश्यक अनुभव: